Posts

Showing posts from October, 2020

अवैध व्यवसायांच्या नियंत्रणासाठी संबंधित विभाग पोलिस यंत्रणेच्या सहयोगाने काम करणार;

Image
*सुधारित वृत्त क्र C-381* अवैध व्यवसायांच्या नियंत्रणासाठी संबंधित विभाग  पोलिस यंत्रणेच्या सहयोगाने काम करणार; सर्वसमावेशक प्रभावी कारवाईसाठी जिल्हास्तरावर स्थापन करणार नियंत्रण कक्ष - सूरज मांढरे नाशिक, 20 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा):   जिल्ह्यातील अवैध धंदे व बेकायदेशीर कृतींवर नियंत्रण मिळण्यासाठी संबंधित विभाग पोलिस यंत्रणेच्या सहयोगाने प्रभावी काम करतील तसेच अवैध धंद्यावर करण्यात येणारी कारवाई सर्वंकष व प्रभावी होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.  आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती कक्षात कायदा व सुव्यवस्था आणि अनुषंगिक विषयांसाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मांढरे बोलते होते. यावेळी पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भगवत डोईफोडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ, पोलिस उपअधिक्षक शर्मिष्टा वालावलकर, पोलिस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, विजय खरात, अमोल तांबे, र...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून योग्य उमेदवारांना लाभ मिळणे आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
वृत्त क्र. C_380     दि.20 ऑक्टोबर 2020     मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून योग्य उमेदवारांना लाभ मिळणे आवश्यक                                                          : जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिक, 20 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकणी नोकऱ्यांचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून योग्य उमेदवारांना लाभ मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बँकर्स सोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक सतीश भामरे, अग्रणी बँक व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा उद्योग निरीक्षक सीमा पवार, प्रकाश घुगे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, तरुण वर्गाला रोजगार मिळ...

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण समाधानाची बाब :केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Image
वृत्त क्र. 378 दि. 18 ऑक्टोबर 2020 जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण समाधानाची बाब                                                   :केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिक, 18 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा):  जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण तसेच जिल्ह्याचा मृत्यूदर देखील राज्याच्या तुलनेत कमी असणे ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले. आज शासकीय विश्रामगृह  येथे घेण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे आदी उपस्थित होते.  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, केंद्र सरकारमार्फत कोरोनाच्या कालावधीत सर्वच राज्यांना...

यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा होणे आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

*वृत्त क्र. 376* *यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा होणे आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे* नाशिक,16 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) आपल्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात जरी असली तरी तिचा उद्रेक कधी होईल हे सांगता येणे कठीण आहे; त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलेले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाचे स्वरूप आणि प्रशासकीय नियोजन यांची माहिती दिली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी नवरात्रोत्सवात भरणारी सप्तश्रृंगी देवीची यात्रा या वर्षी विश्वस्त, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून रद्द करण्यात आली आहे. गडावर कावडी, ज्योत घेऊन जाणारे भाविक यांना यावर्षी गडावर येण्यास मनाई असल्याने त्यांनी येऊ नये; जर कोणी निघाले असतील तर जिथे असाल तिथून त्यांनी मागे फिरावे; आणि आपल्या गावी, घरी जाऊन देवकार्य करावे. गडावरील स्थानिक नागरिकांना पासेस दिले जाणार आहे; मात्र पासेसचा कोणी गैर...

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
 वृत्त क्र. 375              दि. 15 ऑक्टोबर 2020 माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन नाशिक, 15 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) : माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी वासंती माळी, ज्योती कावरे, जिल्हा विधी अधिकारी ॲड. हेमंत नागरे, तहसीलदार राजेंद्र नजन, रचना पवार, नायब तहसिलदार पोपटराव सोनवणे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 0000000

कुटुंबातील जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे बंधनकारकच : जिल्ह्याधिकारी सूरज मांढरे

 वृत्त क्र. ३७४          दि.१४ ऑक्टोबर २०२० कुटुंबातील जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे बंधनकारकच : जिल्ह्याधिकारी सूरज मांढरे खोटे आमिष दाखवून केलेले हक्कसोड पत्र जिल्हादंडाधिकाऱ्यांनी केले रद्द नाशिक, 14 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) कुटुंबातील जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे बंधनकारकच असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.   निराधार बहिणीला आमिष दाखवून केलेले हक्कसोड पत्र  आई, वडील व वरिष्ठांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ या कायद्यातील कलम २३ अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी रद्द केले आहे.  याबाबत नुकताच एक निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मांढरे यांनी दिला. त्यात आदेशीत करताना श्री.मांढरे यांनी नमूद केले आहे की, आई, वडील व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम,२००७ अन्वये उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी निराधार अर्जदार बहिणीला पालनपोषणासाठी दरमहा अन्न, वस्त्राची रक्कम देण्याचे आदेश भावाला दिले होते. या आदेशावर अर्जदार बहिणीच्या भावाने जिल्हादंडाधिकारी नाशिक यां...

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम; सूक्ष्म नियोजनातून कोरोना संसर्गाला अटकाव करा : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
 वृत्त क्र.373 माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम; सूक्ष्म नियोजनातून कोरोना संसर्गाला अटकाव करा : जिल्हाधिकारी सूरज मांढरे जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना नाशिक, 13 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी बाधित रुग्ण शोधून त्यावर वेळेत उपचार होणे अत्यावश्यक आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. या मोहिमेद्वारे सूक्ष्म नियोजन करून कोरोनाच्या आपत्तीला अटकाव आणणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. या मोहिमेबाबत जनतेला आवाहन करा तसेच हेल्पलाईन तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार राजेंद्र नजन आणि जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेत...

जिल्ह्यातील कोरोना संकटातही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे काम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
 वृत्त क्र. C 372 दि. 13 ऑक्टोबर 2020 जिल्ह्यातील कोरोना संकटातही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे काम कौतुकास्पद                                                            : जिल्हाधिकारी सूरज मांढरे राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची सर्वसाधारण सभा संपन्न नाशिक, 13 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा): कोरोना सारख्या भीषण महामारीतून वाटचाल करत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्य कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रत्ना रावखंडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, जिल्हाधिकारी कार्यालयातून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सूर...

सर्वांनी घ्यायला हवेत आपत्ती निवारणाचे धडे ; माहिती, शिक्षण व संवादाच्या माध्यमातून आपत्तीचा सामना करणे शक्य : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
 वृत्त क्र. C-369   दि. 13 ऑक्टोबर 2020    सर्वांनी घ्यायला हवेत आपत्ती निवारणाचे धडे ; माहिती, शिक्षण व संवादाच्या माध्यमातून आपत्तीचा सामना करणे शक्य                                                   : जिल्हाधिकारी सूरज मांढरे जागतिक आपत्ती व्यवस्थापन निवारण दिनाच्या औचित्याने प्रात्यक्षिक सादर नाशिक दि. 13 ऑक्टोबर 2020 (जिमाका, वृत्तसेवा): आपत्तीच्या प्रसंगात स्वतः सोबत इतरांचा बचाव कसा करावा, याबाबत योग्य माहिती नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्य कसे करावे, याबाबतची योग्य माहिती व शिक्षण असेल जत ते संवादाच्या विविध माध्यमातून सर्वांपर्यंत सहज पोहचवता येते आणि यातूनच आलेल्या आपत्तीचा सामना करणे सहज शक्य होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी केले आहे.   आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जागतिक आपत्ती व्यवस्थापन निवारण दिनाच्या निमित्ताने भोसला मिल्ट्री स्कुलच्यावतीने...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे प्रभावी सर्वेक्षण करून मोहीम यशस्वी करावी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
 वृत्त क्र. C-368 ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेद्वारे प्रभावी सर्वेक्षण करून मोहीम यशस्वी करावी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिक, 12 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) कोरोनाच्या आपत्तीला अटकाव करण्यासाठी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेद्वारे प्रभावी सर्वेक्षण करणे करूनच संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.  या सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक कुटुंबात कोणाला काही आजार आहे का याची चाचपणी करून संबंधितांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्कालीन कार्य केंद्राच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अरविंद अंतुर्लीकर, निलेश श्रींगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रत्ना रावखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवासन, डॉ.निखिल सैंदाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, महानगरपालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत शेटे, जिल्हा उद्योग व्यवस्थापक सतीश भामरे, जिल्हा ...

नव्याने रुजू होणाऱ्या तलाठ्यांनी अभ्यासू वृत्ती अंगी बाणवून दर्जेदार काम करावे : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
 वृत्त क्र. C-367   दि. 12 ऑक्टोबर 2020    नव्याने रुजू होणाऱ्या तलाठ्यांनी अभ्यासू वृत्ती अंगी बाणवून दर्जेदार काम करावे : जिल्हाधिकारी सूरज मांढरे जिल्ह्यातील ६७ तलाठ्यांच्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात नाशिक, 12 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा): महसूल प्रशासनातील तलाठी या पदाचा जनतेशी प्रत्यक्ष संबंध असतो. तलाठी हा जनतेसाठी प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतो; त्यामुळे शासकीय सेवांमध्ये तलाठी म्हणून रुजू होताना थेट पदभार न देता संबंधित तलाठ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांनी घेतला असून त्याप्रमाणे नवनियुक्त तलाठ्यांचा एक आठवड्याचे प्रशिक्षण कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुरू झाला.  सर्व तलाठ्यांनी अभ्यासू वृत्ती अंगी बाणवून नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सतत कार्यरत राहावे असे श्री मांढरे म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील नियोजन भवन येथे सुरू असलेल्या 2020 या बॅचच्या ६७ तलाठ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिक...

बैठकांमध्ये चर्चिलेल्या मुद्द्यांवर कालमर्यादेत अंमलबजावणीसह पूर्तता करावी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
 वृत्त क्र. C 367 दि. 12 ऑक्टोबर 2020 बैठकांमध्ये चर्चिलेल्या मुद्द्यांवर कालमर्यादेत अंमलबजावणीसह पूर्तता करावी                                                         : जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिक दि. 12 ऑक्टोबर 2020  : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये विविध विषयांवर वेळोवेळी बैठका होत असतात व त्याचे कार्यवृत्त तातडीने तयार केले जाते. त्यामध्ये नमूद केलेल्या कार्यवाहीच्या मुद्द्यांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करून पुढच्या बैठकीच्या आधी सर्व मुद्द्यांची अंमलबजावणीसह पूर्तता होईल, याची काटेकोर दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या उपजिल्हाधिकारी तसेच कक्ष अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावर...

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून ३५ कोटी ५३ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध : पालकमंत्री छगन भुजबळ

 वृत्त क्र. C- 366 दि. 12 ऑक्टोबर 2020 जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून  ३५ कोटी ५३ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध                                                         : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक दि. १२ ऑक्टोबर २०२० (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हयातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच कोविड कालखंडात पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन निर्देशानुसार २०२०-२१ वर्षाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून ३५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती सांगताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाच्या पूनर्विनियोजनातून २८ कोटी ३५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अन...

‘चुल मुक्त महाराष्ट्र , धुर मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत यशस्वी नियोजनातून नाशिक जिल्हा केरोसीन मुक्त - पालकमंत्री छगन भुजबळ

 ‘चुल मुक्त महाराष्ट्र , धुर मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत यशस्वी नियोजनातून नाशिक जिल्हा केरोसीन मुक्त - पालकमंत्री छगन भुजबळ  जिल्हाधिकारी  व पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन नाशिक,दि.११ ऑक्टोबर २०२० (जिमाका वृत्तसेवा) शासनाने राबविलेल्या ‘चुल मुक्त महाराष्ट्र, धुर मुक्त महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे पुरवठा विभाग व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रम व यशस्वी नियोजनातून नाशिक जिल्हा केरोसीन मुक्त जिल्हा झाला असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यामध्ये दिनांक १ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयान्वये गॅस जोडणी नसलेचे हमीपत्र सादर करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना अनुदानीत केरोसीन चे वितरण करण्यात येते होते. जिल्ह्यातील सर्व बिगर गॅस जोडणी धारकांना गॅस उपलब्ध करुन देऊन केरोसीन मुक्त ...

बिटको रुग्णालयात सर्वच आजारांवर उपचार करणारे व वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

Image
 वृत्त क्र. C 365 दि. 11 ऑक्टोबर 2020 बिटको रुग्णालयात सर्वच आजारांवर उपचार करणारे व  वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन करावे   : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटलच्या कोरोना कक्षाची केली पाहणी नाशिक दि. 11 ऑक्टोबर 2020 (जिमाका, वृत्तसेवा) :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संसर्गबाधितांवर वेळेवर उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आरोग्ययंत्रणा कसोशीने प्रयत्न करत असून त्यामध्ये बिटको रुग्णालयाचे नाव अग्रभागी आहे. भविष्यात सर्वच आजारांवर उपचार करणारे रुग्णालय म्हणजे बिटको रुग्णालय असेल तसेच या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी आज येथे केले आहे. आज नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयाची पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आरोग्य उपसंचालक श्री.मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, महानगरपालिकेचे अतिरिक...

कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील : पालकमंत्री छगन भुजबळ

Image
 वृत्त.क्र. C-364                                          दि. 11 ऑक्टोबर 2020 कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील                                                                               : पालकमंत्री छगन भुजबळ जाधव गॅसेसच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास 70 टक्के ऑक्सिजन पुरविला जाणार विल्होळीच्या जाधव गॅसेस ऑक्सिजन निर्मिती प्लँटचे झाले उद्घाटन नाशिक,दि.11 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा): जगावर आलेली कोरोना ही आपत्ती रोखण्यासाठी गेल्या 7 महिन्यांपासून सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहे. या आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील आहोत, कोरोनाबधितांवर वेळेवर उपचार होणेसाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता ज...

शासन प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; ॲक्टीव्ह रुग्ण व घटणारा मृत्यूदर आशादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

Image
 वृत्त.क्र. C-362                                         दि.10 ऑक्टोबर 2020 शासन प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; ॲक्टीव्ह रुग्ण व घटणारा मृत्यूदर आशादायी                                                    : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक दि. 10 ऑक्टोबर 2020 (जिमाका, वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 761 ने कमी झाली आहे. त्यात असणारे सातत्य पाहता जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असून नाशिक जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करतोय, असे दिलासादायक प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी आज येथे केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शहरातील व जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना संबंधी घेण्यात आले...
 जिल्ह्यातील परमीट रूम, हॉटेल्स आणि आस्थापनांची वेळ निश्चित;    वेळेबाबत नियम न पाळल्यास होणार कारवाई                                                                                : जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिक, 10 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील परमीट रूम, हॉटेल्स आणि आस्थापनांची वेळ निश्चित करण्यात आलेली असून वेळेबाबत नियम न पाळल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निर्गमित केले आहे. जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी निर्गमित केलेल्या शासकीय आदेशानुसार, राज्यात मिशन बिगीन अगेन बाबत अधिसूचना जाहिर करण्यात आलेली असून त्यानुसार नाशिक जिल्ह्यात 5 ऑक्टोबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात परमीट रूमसाठी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत, मद्या...

यंदा सप्तश्रृंगी देवीचे दर्शन ऑनलाइन सुरू करण्याबाबत उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

 वृत्त क्र. C359 यंदा सप्तश्रृंगी देवीचे दर्शन ऑनलाइन सुरू करण्याबाबत उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विश्वस्त मंडळासोबत झालेल्या बैठकीत निर्णय नाशिक, 08 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) कोरोना या जागतिक महामारीमुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन अहोरात्र प्रयत्न करून या महामारीचा सामना करत आहे. येत्या १७ तारखेपासून नवरात्रोत्सव सुरू होत असून राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे यंदा हा उत्सव आपण साजरा करू शकत नाही; मात्र भाविकांची श्रद्धा लक्षात घेता विश्वस्त मंडळाने सोशल मीडिया, दूरचित्रवाणीद्वारे  देवीचे दर्शन ऑनलाईन सुरू करण्याबाबत उपाययोजना कराव्यात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. ते आज मौजे सप्तश्रृंगी गड येथे झालेल्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या वर्षीचा नवरात्रोत्सव कसा असावा याबाबत नियोजन बैठकित अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी विकास मीना, उपविभागीय ...

आता ड्रोनद्वारे राहणार प्रशासनाची अवैध उत्खननावर करडी नजर : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

 वृत्त क्र. C358 आता ड्रोनद्वारे राहणार प्रशासनाची अवैध उत्खननावर करडी नजर : जिल्हाधिकारी सूरज मांढरे राज्यात सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात कार्यान्वित  नाशिक, 08 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) नाशिक जिल्ह्यात अवैध उत्खनन व वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनास प्राप्त होत आहेत.  त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून यावर उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, अवैध उत्खननावर तसेच अवैध वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य शासनाने शौर्य इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.  या ड्रोन प्रणालीची सुरुवात सर्वप्रथम आपल्या नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे दगड- खदानीचे छायाचित्रीकरण करून त्या खदानीची सीमा पडताळणी व भू संदर्भ निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच खदान्याच्या कामकाजाचे विश्लेषण करण्यासाठी नियमित ...

राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद - छगन भुजबळ

 राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद - छगन भुजबळ नाशिक, दि. ०८ ऑक्टोबर२०२० (जिमाका वृत्तसेवा)  : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा  महत्वकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरु केली. राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  महाविकास  आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन ही महत्वकांक्षी योजना सुरु केली. राज्यात २६ जानेवारी शिवभोजन या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता...

टॅबलेट आणि मोबाईल ला दूरचित्रवाणीची जोड दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
 वृत्त क्र. C 350 दि.5 ऑक्टोबर 2020 टॅबलेट आणि मोबाईल ला दूरचित्रवाणीची जोड दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न                                                          : जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिक, दि. 5 ऑक्टोबर,2020 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी शिक्षण विभाग सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नाला आधुनिकतेची जोड देऊन दूरचित्रवाणीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे घरोघरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  जिल्हाधिकारी यांचे दालनात झालेल्या या बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीव म्हसकर, डेन ...

जिल्ह्यात पर्यावरण समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Image
  वृत्त क्र. C 349 दि.5 ऑक्टोबर 2020 जिल्ह्यात पर्यावरण समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा योजनेची                       अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न आवश्यक                                                : जिल्हाधिकारी सूरज मांढरे माझी वसुंधरा योजनेसाठी नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण      विभागाचे प्रादेशिक अधिकारी अमर दुरगुळे यांची नेमणूक नाशिक, 5 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच शुभारंभ केलेल्या माझी वसुंधरा योजनेची सुरुवात आपल्या जिल्ह्यात होत आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वच यंत्रणांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.  जिल्हाधिकारी यांचे दालनात झालेल्या "माझी वसुंधरा" योजनेच्या अंमलबजावणी बाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अध...