जिल्ह्यातील कोरोना संकटातही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे काम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

 वृत्त क्र. C 372 दि. 13 ऑक्टोबर 2020



जिल्ह्यातील कोरोना संकटातही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे काम कौतुकास्पद

                                                           : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची सर्वसाधारण सभा संपन्न


नाशिक, 13 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा):

कोरोना सारख्या भीषण महामारीतून वाटचाल करत असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्य कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले.


राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रत्ना रावखंडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, जिल्हाधिकारी कार्यालयातून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देशमुख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सूर्यवंशी तसेच तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत आर्थिक, भौतिक, आरोग्यवर्धिनी केंद्र, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.


यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी टप्पा 2 मध्ये सर्व्हेक्षण करत असताना 0 ते 5 वयातील बालकांची तपासणी करावी. यामध्ये बालकाच्या चेहऱ्याची विकृती, जीवनसत्त्व कमतरता, आजार आणि गतीमंद या 4डी ची तपासणी करण्यात यावी. यामध्ये बालकांमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित उपचार करण्यात यावे.


प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण १ लाख १९ हजार ४७९ म्हणजे ८६% गरोदर मातांना एकूण ५००० रुपयांचा लाभ देण्यात लाभ देण्यात आला आहे. तसेच जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता आणि ० ते १ बालक अशा एकूण ९१% महिलांना गरोदर दरम्यान मोफत संदर्भ सेवा देण्यात आलेली आहे. 


क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे; त्यांना निक्षय पोषण योजनेंतर्गत दरमहा पाचशे रुपये बँक खात्यात जमा केले जात आहेत.


पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सध्याची कोव्हीड परिस्थिती मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातून चांगले कार्य होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. यापुढेही आरोग्य विभागाकडून असेच कार्य होत राहील असा विश्वास व्यक्त केला.




0000000000

Comments

Popular posts from this blog

शासन प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; ॲक्टीव्ह रुग्ण व घटणारा मृत्यूदर आशादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील : पालकमंत्री छगन भुजबळ