माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
वृत्त क्र. 375 दि. 15 ऑक्टोबर 2020
माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
नाशिक, 15 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) :
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी वासंती माळी, ज्योती कावरे, जिल्हा विधी अधिकारी ॲड. हेमंत नागरे, तहसीलदार राजेंद्र नजन, रचना पवार, नायब तहसिलदार पोपटराव सोनवणे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0000000

Comments
Post a Comment