जिल्ह्यातील परमीट रूम, हॉटेल्स आणि आस्थापनांची वेळ निश्चित; 

  वेळेबाबत नियम न पाळल्यास होणार कारवाई

                                                                        : जिल्हाधिकारी सूरज मांढरे


नाशिक, 10 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा) :

जिल्ह्यातील परमीट रूम, हॉटेल्स आणि आस्थापनांची वेळ निश्चित करण्यात आलेली असून वेळेबाबत नियम न पाळल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निर्गमित केले आहे.


जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी निर्गमित केलेल्या शासकीय आदेशानुसार, राज्यात मिशन बिगीन अगेन बाबत अधिसूचना जाहिर करण्यात आलेली असून त्यानुसार नाशिक जिल्ह्यात 5 ऑक्टोबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात परमीट रूमसाठी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत, मद्याविक्रीसाठी नसलेले हॉटेल्स यांची वेळ सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत तर अन्य आस्थापनांची वेळ सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार असल्याचे नमूद केले आहे.


संबंधित वेळेबाबत असलेल्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा 1897 तसेच या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमांन्वये कायदेशीर कारवाई होणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी आदेशद्वारे म्हटले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासन प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची लवकरच कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; ॲक्टीव्ह रुग्ण व घटणारा मृत्यूदर आशादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील : पालकमंत्री छगन भुजबळ